जळगांव माझ्या नजरेतून
कोविड १९ महामारीने तीन महिने घरात बसणं माझ्यासारख्या भटक्याला किती अवघड गेलं असेल याची कल्पना न केलेली बरी . लोकडाऊन असतांना आणि उठल्यावर हफ्त्यातून २-३ दिवस संध्याकाळी फिरणं हे नित्य नियमाचं. फोटोग्राफी म्हटलं कि माझा जीव कि प्राण. घरात बसून फोटो काढून किती काढणार?? आणि कसले काढणार ?? आपल्याला मस्त निसर्गात जाऊन सूर्योदन आणि सूर्यास्त आणि निसर्गाचे फोटो काढायला आवडतात. लोकडाऊन मध्ये मग घरी असल्याने रिकाम्या वेळेचा पुरेपूर सदुपयोग घेत जमेल तेव्हा मोबाईल ने घराजवळील आणि शहरातील ठिकाणांचे बरेच फोटो काढले. त्यातील काही निवडक आणि मला आवडलेले फोटो इकडे ब्लॉग च्या माध्यमांतून तुम्हाला दाखविण्यासाठी हा सगळा प्रपंच. यात असलेले सगळेच फोटो हे मी माझ्या मोबाईल ने काढलेले आहेत. फोटोनंतर ठिकाण कुठल आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
अधिक करून फोटोस हे मिरर इमेजेस आहेत. म्हणजे पाऊस पडून गेल्यावर पावसाच्या पाण्यात दिसणारे प्रतिबिंब. यात कुठलीही हेराफेरी केलेली नाही (सॉफ्टवेअर किंवा इतर काहीही वापरलेलं नाही ). सगळेच नैसर्गिक फोटो आहेत. तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा करतो. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे सजेशन माझ्यासाठी मोलाचे ठरतील. त्यासाठी तुम्ही पोस्टवर कंमेंट करू शकता .
अमोल नंदकिशोर देशमुख
९९७०३९८६१६
या फोटोच ठिकाण सांगायची गरज वाटत नाही तरी ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी - हे ठिकाण म्हणजे जळगावकरांच्या अगदी जवळचं आणि हक्काचं - मेहरूण तलाव. मित्रांसोबत किंवा परिवारासोबत सकाळ संध्याकाळ किंवा दिवसभरातून कधीही जाऊन थोडा वेळ इकडे घालविला कि सगळं टेन्शन नाहीस होत . माझ्या घरापासून हे ठिकाण फक्त एक किलोमीटर अंतरावर . वाटलं तेव्हा मी इकडे निघून येतो . आणि प्रत्येक वेळेस या तलावाचं आणि परिसराचं रूप मला फोटो घेण्यास भाग पाडत .
हा फोटो म्हणजे लोकडाऊन मधील अशीच एक निवांत दुपार. तलावाच्या कडेस एकटाच बसलेला हा मनुष्य, न बोलणारा ,स्वतःच्या दुनियेत मग्न दिसून आला. लगेचच यात एक गोस्ट दडलेली मला जाणवली आणि मी मोबाईल काढून फोटो घेतला .जवळून गेल्यावर बघितलं तर हा माणूस कणकेचा गोळा घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे तलावात फेकत होता.खाली पाण्यात बघितल्यावर छोटे छोटे मासे गर्दी करून होते. त्या माणसाच्या मागे तीन कुत्रीसुद्धा निवांत बसलेली होती . बहुदा त्या माणसाचं तिकडे रोजच येणं जाण असावं असं वाटतं होत. मी सुद्धा बराच वेळ तिकडे थांबून होतो. कणकेचा गोळा संपताच तो माणूस काहीही न बोलता लगेचच निघून गेला.
वरील फोटो मुद्दाम कृष्णधवल केला आहे . हे ठिकाण मोहाडी रोड वर मंदिराच्या मागे असलेली टेकडी. खाली दिसणारा परिसर म्हणजे खुबचंद साहित्या टॉवर ,डाव्या बाजूला दिसणारी इमारत म्हणजे नवीन बांधण्यात येत असलेलं महिला शासकीय रुग्णालय. फोटो मला खास आवडण्याचं कारण म्हणजे वर आकाशात जमा झालेला एकमेव भलामोठा ढग .
लोकडाऊन मधील फोटोग्राफी च अजून एक आवडीचं ठिकाण म्हणजे घराची गच्ची . रोज संध्याकाळी वर बसून निवांत सूर्यास्त बघत बसायचं . रोज आकाशात दिसणारे रंग हे दंग करून सोडतात आणि सगळं काही विसरायला भाग पडतात. अशीच एक रंगबिरंगी संध्याकाळ मोबाईल मध्ये कैद करण्याचा प्रयत्न .
वरील सर्व फोटो जळगांव च्या विविध भागांमध्ये मोबाईल च्यासहाय्याने घेतलेले आहे. यासाठी फिरणं आणि तुमचं निरीक्षण महत्वाचं . जिथे कुठं स्वच्च पाणी साचलेलं दिसेल तिथे चांगली फ्रेम किंवा फोटो काढता येईल का हे मी बघतो . फोटो मध्ये एखादा ऑब्जेक्ट असला तर फोटो अधिक बोलका दिसतो . त्यासाठी प्रत्येक फोटोमध्ये तुम्हाला काहीतरी दिसेलच . वरील सर्व फोटो हे मोबाइल मध्ये काढलेले आहेत .
अशी अजून अनेक वेगवेगळ्या परिसराची फोटो मालिका तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. जर खरंच तुम्हाला आवड असेल तर आहे त्या उपकरणाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आजूबाजूचं सौंदर्य तुमच्या मोबाईल मध्ये कैद करू शकता. मी माझ्या परीने केलेला हा छोटासा प्रयत्न . आपणास काही सूचना ,जागा किंवा इतर काही गोष्टी सुचवायच्या असतील तर कृपया नक्की कळवा . तुम्ही मला कॉल ,msg किंवा मेल करू शकता .
अमोल देशमुख
९९७०३९८६१६
amol2050@gmail.com
Instagram Id - amol2050



































Superb
ReplyDeleteAwesome..
ReplyDeleteVery beautiful
ReplyDeleteBest photographs of Jalgaon till now
ReplyDeleteAwesome photography. I liked that mirror photography. You can't even recognise which photo is real and which is the mirror one.
ReplyDeleteWow amol your photography is too awesome but whatever you wrote about each photo that's really heartwarming as well as heart touching raeality .
ReplyDeleteAnd i always fond of the thing that realted to my lively home town jalgaon
Thank you
Best photographs of Jalgaon .
ReplyDeleteAwsm Photos sir 🔥🔥
ReplyDeleteI have seen many photographers throughout Social Media but
ReplyDeleteA Guy who does magic just with Mobile Camera....You're only of a kind !
#TALENTNEXTLEVEL
Awesome 👏
ReplyDeleteSimply superb
You have captured the beauty of nature very nicely 👆
"Nature is god"
ReplyDeleteSir you gave us to see such a wonderful pictures of god.sir keep capturing and enjoying
Awesome photos sir and those contain you wrote it's too wonderful.👌👌
ReplyDeleteखुप छान आहे सर्वे picture
ReplyDeleteAwesome sir... Pictures are fab
ReplyDeleteJalgaon❤️...Beatiful reflection!Great capture!
ReplyDeleteLovely capture of a lovely season 😍👌
ReplyDeleteखूप सुंदर फोटो आणि लिहलं ही खूप छान आहे अमोल।
ReplyDeleteअप्रतिम फोटोग्राफी अमोल दादा, आणि फोटोज बद्दल जे लिहिले आहे तेही फोटोज ला सजेस आहे.
ReplyDeleteAmazing pics captured incredible sir
ReplyDeleteThe quotes and writings were just awesome and the clicks are so natural.Keep clicking this type of pictures sirr.
ReplyDeleteअमोल,
ReplyDeleteअप्रतिम फोटो पाहून मी फारच प्रभावीत झालो आहे. यापाठीमागे तुझी साधना, निदिध्यास व कलात्मक सृजनशीलता आहे. एकदा याची प्रदर्शनी भराव गड्या.
अमोल,
ReplyDeleteअप्रतिम फोटो पाहून मी फारच प्रभावीत झालो आहे. यापाठीमागे तुझी साधना, निदिध्यास व कलात्मक सृजनशीलता आहे. एकदा याची प्रदर्शनी भराव गड्या.
Ek no photo bhai
ReplyDeleteAwesome Photography my dear brother..By mobile its difficult to acheive this accuaracy of photographs..Keep it up..
ReplyDeleteAmazing work dada🤩🤩🤩
ReplyDeleteसृजनशीलतेला कोणत्याही lockdown चे बंधन नसते, तुम्ही lockdown चे कितीतरी सुंदर क्षण कैद करून छान शब्दबद्ध केले, अप्रतिम कलाकृती,superb!!!����
ReplyDeleteसृजनशीलतेला कोणत्याही lockdown चे बंधन नसते, तुम्ही lockdown चे कितीतरी सुंदर क्षण कैद करून छान शब्दबद्ध केले, अप्रतिम कलाकृती,superb!!!����
ReplyDeleteAwesome, keep it up 👍👍👍👍👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteAmazing.....perfectly captured 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteSuperb Amol sir..it's shows that your dedication towards photography..keep it up..
ReplyDeleteSuperb work amol....
ReplyDeleteअतिशय सुरेख कल्पकतेने काढलेले फोटो हा छंद कायमस्वरूपी ठेवावा अमोल दादा खूपच ग्रेट फोटो
ReplyDeleteअतिशय सुरेख कल्पकतेने काढलेले फोटो हा छंद कायमस्वरूपी ठेवावा अमोल दादा खूपच ग्रेट फोटो
ReplyDeleteअप्रतिम निसर्गाची लिलया टिपन्याचा सुरेख ताळमेळ..
ReplyDeleteSuperb sir all the photos are really good
ReplyDeleteSuperb👍
ReplyDeleteVery good once again i recall jalgaon roads, best vesiting places.
ReplyDeleteThanks
Very very Great photography Amol Bhau
ReplyDeleteThank you
All photos are amazing sir 👌😍
ReplyDeleteI am really thankful for the valuable feedback.. It will motivate me to do more hardwork.. Thanks for your valuable time 🙏
ReplyDeleteKhup chhan n mastttt आकर्षक pics click kelet sir tumhi.. Ek ch no.... ��������������������
ReplyDeleteMla pn khup kahi shikayla milt tumchakdun nehmi...awsm pics amol sir...��������
अप्रतिम Photography आहे सर जी🤩😍
ReplyDeleteअति सुंदर सर, खरच अप्रतिम!!😍💞
ReplyDeleteसुंदर....😊😍👌👌
ReplyDeleteApratim photography!
ReplyDeleteFlawless
As always next level sir🔥🙌🏻
ReplyDeleteEvery picture tells story amazingly...
ReplyDeleteअप्रतीम फोटो आहेत ही
ReplyDeleteखुपच आवडलीत मला 👌👌
अप्रतिम फोटग्राफी. खूपच छान आहे सर सगळेच फोटो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteलॉकडाऊन मधी पण फोटोग्राफी छंद छान जोपासला
ReplyDelete