अवनी - एक नरभक्षक वाघीण
वन्यजीव प्राण्यांमध्ये वाघ हा कमालीचा आकर्षक , सुंदर... वाघाला प्रत्यक्षात बघितल्यावर कळत की त्याला जंगलाचा राजा का म्हणतात.अशीच एक भली मोठी वाघीण जेव्हा नरभक्षक होतो आणि तब्बल 13 नरबळी घेऊन संपूर्ण यंत्रणेला तब्बल 2 वर्ष चकवा देत आपली दहशत माजवीते तेव्हा ती संपूर्ण महाराष्ट्र सोबत संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनते. या वाघिणीची एवढी दहशत होती की यवताळमधील तब्बल कित्येक शेकडो किलोमीटर मधील गावात लॉकडाऊन लागला होता. नागरिक प्रचंड भयभीत होते सोबत त्यांचा प्रशासनावर खूप जास्त रोष वाढला होता.
या वाघिणीला पडकण्यासाठीचे सर्व शर्थीचे प्रयत्न असफल झाले होते.दिवस रात्र शोधमोहीम घेऊन सुद्धा ही वाघीण सापडत नव्हती. वन्य विभागाने आपले हाथ टेकले होते.शेवटी प्रशासनाने हैदराबाद येतील व्यावसायिक शूटर नवाब शफात अली खान यांना या मोहिमेसाठी आमंत्रण देत या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी ताबडतोब येण्याची विनंती केली. आपण त्वरित या मोहिमेत सामील होऊन या वाघिणीला जिवंत अथवा ठार करावे अशी प्रशाशनाने विनंतीचे पत्र पाठविले.
अली खान हे मुळात एक शूटर घराण्यातले त्यांचे वडिल प्रसिद्ध शूटर, त्यांचाच वारसा पुढे चालवत खान यांनी या आधी बऱ्याच मोहिमेत सहकार्य केलं आहे. वाघ, बिबट्या, हत्ती, अश्वल अश्या बऱ्याच प्राण्याच्या शोधमोहीम वेगवेगळ्या राज्यांनी त्यांना आमंत्रित केले होते. अवनी साठी सुद्धा त्यांच्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांचं संपूर्ण आयुष्य जंगल आणि आणि वेगवेगळ्या मोहिमेत गेल्यामुळे त्यांच्याकडे अनुभव प्रचंड प्रमाणात होता. मोहिमेस बोलावले तेव्हा त्यांचे वय 60 वर्ष होते.
पुस्तकं कमालीचे थरारक आणि योजनेत आलेल्या अडथळ्यांची श्रुखला असलेले आहे. तब्बल शेडको कोटी रुपये खर्च करून सुद्धा ही वाघीण हाती लागत नव्हती.
पुस्तकात बरेच प्रसंग, आलेले बरे वाईट अनुभव स्वतः अली खान यांनी नमूद केले आहे. अनेक आशा आणि निराशा, मेलेल्या लोकांच्या हृदयपिळवून टाकणाऱ्या गोष्टी यात आहे. सात वर्षाच्या मुलापासून 60 वर्षाच्या म्हातर्यापर्यंत सगळ्यांना या वाघिनिने आपले भक्ष बनविले होते.या मोहिमेत अली खान यांचा मुलगा अजगर खान देखील समाविष्ट होतो. दोघांनी वनविभाग सोबत दिवस रात्र शोधमोहीम घेत या वाघिणीचा शेवटी बंदोबस्त करत तिला ठार केले.
एकीकडे वाघीण ठार झाल्यामुळे आनंद वक्त करणारे मृतांचे नातेवाईक आणि दुसरीकडे प्राणी प्रेमींनी पेपर मधे केलेली आगपाखड, शेवटी कोर्टात गेलेलं हे प्रकरण आणि हाय कोर्टाचा आलेला निकाल अश्या बऱ्याच चढ उतरांनी, अनुभवांनी भरलेले हे पुस्तकं वाचत असताना खिळवून ठेवत.
सोबतच जळगांव जिल्यातील चाळीसगांव तालुक्यात सुद्धा एक नरभक्षक बिबट्याने आपली दहशत माजवीत होता. त्याचे सुद्धा रोमहर्षक अनुभव या पुस्तकात आहेत.पुस्तकाच्या शेवटी वाघांबद्दल बरीच माहिती या पुस्तकद्वारे अली खान यांनी दिली आहे.या पुस्तकाचा मराठी अनुवाद विक्रमसिंह पटील आणि श्रीनिवास कचरे यांनी उभेहुन केला आहे.
सगळ्यांनी आवर्जून वाचव अस हे पुस्तक आपण सर्वांनी सुद्धा नक्की वाचावे .
अमोल देशमुख
९९७०३९८६१६

No comments:
Post a Comment