नाशिक एक स्वछ आणि सुंदर शहर,याची खरी सुंदरता अनुभवायची असेल तर ती रात्री देखील अनुभवता येते. शहरात येणार प्रत्येक भटका किंवा पाहुणा हा पंचवटी परिसराला भेट दिल्याखेरीज जात नाही.सहसा दिवसभर हा गोदावरी चा परिसर खूपच भाविकांच्या गर्दीने गजबजलेला असतो. मनात आले कि रात्री हा कसा असेल किंवा निर्मनुष्य असल्यावर कसा दिसेल म्हणून एके दिवशी रात्री १२ नंतर गोदातिरेवर गेलो. एक वेगळं आयुष्य अनुभवत होतो. ज्यांना कुणाला निवारा नाही अश्या असंख्य लोकांची किंवा कामानिमित्त शहरात आलेल्यांची, अपंग लोकांची, दारिद्र्य रेषेखालील लोकांची निवार्याची सोय हा परिसर करत असतो. शेकडो कुटुंब या परिसरात तुम्हाला रात्री थिरावलेले दिसतील. असाच एक माणूस निवांत निद्रावस्तेथ असताना चा हा फोटो मला खूपच भावला आणि लगेचच बर्याचश्या गोष्टींचा उलगडा डोळ्यासमोर आला.
Copyright of Photograph - Mr.Amol N Deshmukh
Copyright of Photograph - Mr.Amol N Deshmukh

No comments:
Post a Comment