निमित्त होत गडवाट वर्धापन दिन. दि १७ जुलै. गडवाट ने आपल्या ४ थ्या वर्ष्यात पदार्पण केल आहे . बघता बघता इवल्याश्या रोपट्याचे रुपांतर आज मोठ्या वातावृक्ष्यात झाले आहे. फेसबुक वर ३-४ भटक्या मित्रांनी बनवलेल्या ग्रुप चे रुपांतर आज संस्थेत झाले आहे, संस्थेत म्हणण्या पेक्ष्या मोठ्या परिवारात झाले आहे. गडांचे संवर्धन करता करता अनेक सामाजिक उपक्रम गडवाट ने राबविले आहेत.
२० जून ला वर्धापन दिनाच्या अनुशंघाने शिवनेरी किल्ल्यावर बाल-गोपालांसोबत गड भ्रमंती आणी किल्ल्यावर त्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला होता .
२० जुलै ला सगळ नियोजन ठरले होतं. मी सुद्धया ठरवलं. ओढ लागली ती शिवनेरी चढायची आणि शिवरायांच्या जन्म स्थळाला भेट देण्याची. महाराज ज्या किल्ल्यावर जन्मले ,खेळले,लहानाचे मोठे झाले तो किल्ला कसा असणार? याची सर्वात जास्त उत्स्तुकता लागून होती . माझ्या सोबत जळगावचे माझे जवळचे मित्र रवींद्र पाटील हे सुद्धा होते . त्यांच्यासाठी हा १ वेगळा अनुभव होता . १९ तारखेला जॉब संपवून आम्ही संध्याकाळी नाशिक ला जायला निघालो . पाऊस असल्या कारणाने नाशिक ला पोहचायला बराच वेळ लाऊन गेला . नाशिक ला रात्री मुक्काम करून भल्या पहाटे शिवनेरी ला जायचे ठरले होते. रात्री १२ ला नाशिक ला पोहचलो. सकाळी ४ ला उठून लगेच निघायचे होते. बाकीचे गडवाट चे नाशिक चे मित्र सोबत येणार होते.
९ जन जमलो त्यात २ वक्तिमत्व हे माझ्यासाठी अगदी वेगळे होते . १ ईश्वर माने २ डॉ गायकवाड . या गोघाचे इतिहासाच अभ्यास एकदम दांडगा .
शेवटी शिवनेरी चा प्रवास चालू झाला. नाशिक ते शिवनेरी अंतर १५० किमी . तवेरा गाडी ने आम्ही निघालो होतो . जवळपास ३ तास लागणार होते.
गाडीत हळू हळू इतिहासाच्या गप्पा चालू झाल्या . गप्पामध्ये वेळ कसा निघून गेला काही लाळले सुद्धा नाही .
सकाळी जवळपास ९ ला आम्ही जुन्नर ला पोहचलो. जुन्नर म्हणजे पुणे जिल्ह्यातील १ तालुका . त्यालाच लागून शिवनेरी किल्ला आहे.
शिवनेरी च्या पायथ्याला ला १ हॉटेल आहे "शिवनेरी" म्हणून . तिथे सगळ्यांनी थांबून नाश्ता करून घेतला . सगळे तयारी करून शिवनेरी चढायला निघालेत . वाटेत मुंबई, पुणे येथून आलेले गडवाटकरी भेटत होते . सर्व जण पायथ्याला एकत्र जमलेत . आमच्या सोबत जुन्नर मधील
जिल्हापरिषद प्राथमिक शाळा कुलवडे आणि संत गाडगेबाबा विद्यालय येथील लहान मुल सोबत जमली होति. खरतर यांच्या साठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
अखेरीस त्या मुलांसोबत आम्ही गड चढायला सुरुवात केली . गड चढत असताना दिसून येत होते कि किल्ल्या ची डागडुगी करण्यात आलेली आहे . सगळा परिसर स्वच्छ्य होता . अधून मधून पाऊस येत होता ,थंडगार वारा सुटला होता . पायथ्याशीच लावलेल्या नकाशा पाहून किल्ल्याचा अंदांज येतो.
किल्ल्यावर सुरवातीला किल्ल्याच्या महादरवाजा लागतो जेथून किल्ल्यात प्रवेश होतो
इतिहास थोडक्यात असा आहे कि
१५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला.
थोड वर चढल्यावर दिसून येतो तो भला मोठा "अंबरखाना"(हत्ती - घोडे ) गडावर बांधून ठेवण्यासाठी असलेल ठिकाण . त्याच्या मागे उभा असलेला विराट सह्याद्री दिसून येतो.
अधून मधून पाऊस येत होता आणि थंडगार हवा येत होती . एक अविस्मरणीय अनुभव येत होता . छोटी मुल त्याचा पुरेपूर आनंद घेत होती . त्यांच्या चेहर्यावरील स्मित हास्य बरेच काही सांगून जात होत . १ तासात गड चीमुक्ल्यांसोबत चढून पूर्ण झाला. सर्व शाळकरी मुल आणि गडवाटकरी किल्ल्यावर पोहचले .
किल्ल्यावर जिजाऊ मा साहेब आणि लहान शिवबा ची प्रतिकृती आहे . त्यसमॊर कार्यक्रम होणार होता . सगळे जण तिथे येउन बसलेत . कार्यक्रमाला सुरुवात झाली .प्रस्तावना आणि मान्यवरांचे मनोगत पूर्ण झाले. त्यानंतर मूळ शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम चालू झाला . प्रत्येक गडवाटकार्याच्या हाताने लहान मुलांना साहित्य वाटप चालू झाले .
शालेय साहित्य मध्ये शाळेची ब्येग ,वह्या ,रंग, पाण्याची बाटली ,काम्पौस पेटी इत्यादी साहित्य होते. साहित्य वाटप झाल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होता,त्यानं.तर ३०० पुस्तकांचे ग्रंथ त्या लहान मुलांच्या शाळेला भेट देण्यात आले .शेवटी खाऊ वाटप करण्यात आला .
कार्यक्रम संपल्यावर सगळे जण किल्ला बघायला निघाले . आमच्या सॊबत इतिहासाचे गाढे अभ्यासक ईश्वर माने होते, ते आम्हाला मार्गदर्शन करत होते . शिवनेरी वर १ मस्जिद सुद्धा आहे. यावरून असं दिसून शिवाजी महाराज \कुण्या जातीच्या किवा धर्माच्या विरोधात नव्हतेच. गडावर पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून लहान - मोठे कुंड तयार करून ठेवलेले आहे . पाण्याच निचरा होण्याचे उत्तम उदाहरण किल्ल्यावर आहे .
या नंतर आम्ही गेलो थेट शिवजन्म स्थळ येथे .तिथे आम्ही शिवरायांना नमन केले. त्याठिकाणी मध्ये शिवरायांची मूर्ती आणि डाव्या बाजूला पाळणा ठेवण्यात आलेला आहे . येथेच शिवराय जन्मले ,आम्ही तेथे नतमस्तक झालो .
बराच वेळ झालेला होता , दुपारचे २ वाजले होते . आम्ही पुढे बघायला निघालो " कडेलोट" टोक . शिवनेरी च शेवटच टोक, तेथे पोहोचल्यावर दिसत होता तो विराट सह्याद्री. ज्याने आपल्या कुशीत बरेच काही सांभाळून ठेवले आहे . तेथे जाणवणारी निस्ताब्धता , जोरदार वाहणारा वारा मनाला शांतता देत होती . नजर जाईल तिथपर्यंत दिसणारा अथांग निसर्ग आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा. तिथून परतायची मन होत नव्हते पण वेळ कमी होता.
नंतर मग आम्ही सगळ्या गड वाट कर्यांचा निरोप घेतला आणि गड परत खाली उतरायला सुरुवात केली . पुन्हा एकदा शिवनेरी ला सगळ्यांनी वंदन केली आणि सगळे खाली उतरायला निघाले . गड खाली उतरत असताना वाटेत लागते " शिवाई" देवी च मंदिर . याच देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव महाराजांचे ठेवण्यात आले . देवीचं दर्शन घेतले,तेथे थोडा वेळ बसून परत खाली परतीचा प्रवास चालू झाला .
पायथ्याशी आलो तेव्हा ५ वाजले होते . शेवटी बर्याच आठवणी मनात साठवून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला . गाडी मधून परतत असताना दिसून येत होता तो विरत "शिवनेरी".
पावसाळा +ट्रेक +समाजकार्य या सगळ्याचा अनुभव मनाला वेगळेच समाधान देऊन गेला . शिवनेरी या आठवणीसाठी सदैव मनात राहील .

No comments:
Post a Comment