Monday, December 1, 2014

आठवणीतला रायगड

आठवणीतला रायगड
सगळ्यांना माहितीच आहे कि ६ जुन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. एक असा दिवस ज्याची सगळे शिवभक्त दसरा - दिवाळी प्रमाणे आतुरतेने वाट बघत अस्तो. बरेच वर्ष झाले रायगडावर जायचा प्रयत्न करत होतो ,शेवटी या वर्षी योग जुळून आला । इतिहासाची आवड तशी आधीपासूनच आहे ,पण तो इतिहास स्वताच्या साक्षीने रायगडावर जाऊन अनुभवायचा होता. शेवटी जायचे ठरले . जळगाव वरून थेट मुंबई गाठली . ५ जून ला सकाळी मुंबई ला पोचलो . ज्या संस्थेत मी आहे ( गडवाट) आमचे नियोजन ठरले होते . मुंबई वरून २ बसेस केल्या होत्या . सगळे मित्र आप आपले जोब संपवून येणार होते. मी वाशी वरून बसलो .सगल्याना गोळा करत करत रात्री चे १० वज्लेत.शेवटी रायगडचा प्रवास चालू झाला
अजून बाकीचे मित्र (गडवाटकरी)पुणे,अहमदनगर ,सातारा,नाशिक वरून यायला निघाले होते.
रात्रीचा प्रवास सुरु झाला . हळू हळू वेळ निघत होत. वाटेतच लोकांचे समूह दिसून  पडत होते  ते रायगडावर येण्यासाठी . सुभेच्च्या  फलक दिसू लग्लेत.सम्जुन  आलं  रायगड जवळ येतोय. उत्सुकता वाढतच चालली होती. शेवटी  पोचलो  पाचाड. (जिजाऊ समाधी स्थळ ). बाकीच्या मित्र तेथे  पोचले होतेच.  मग तिथून खरा पायी प्रवास चालु झाला . सगळे मुल -मुली ग्रुप बनवून निघाल. सगळ्यांनी सोबत तोर्च ,सकाळ  लागणार नाशता आणी पिण्याचे पा -नि सोबत ब्यागेत घेतले होते .  रायगडच्या पायथ्याला देशमुख होटेल आहे. एकमेव  जिथ जेवणाची उत्तम सोय असते. गर्दी वाढत होती. बरेच लोक भेटत होते . शेवटी रात्री ३ ला रायगडाच्या पायथ्याला पोचलो . तिथे  नतमस्तक  होऊन गड चढायला सुरुवात केली . हळू हळू सगळे वर चढू लागलेत . सुरवातीला थकवा जाणवत नव्हता पण  नंतर १-१ पायरी चढणे मुश्किल झालं . यावरून अंदाज  येत होता कि  जो किल्ला चढायला एवढ्या त्रास होतोय तो किल्ला महाराजानी   त्यआ काळात   कसा बांधून पूर्ण केला केला असणार???
त्याच विचारात हळू हळू वर चढत जात होतो . रस्त्यात खुप दम लगत होता. बघता बघता पणी संपत चालले होते. फक्त १ बटरी च्या प्रकाष्यत चढाई चलू होती. प्र्त्याक्ष्यात असे  वाटत होते कि मी जनू १ मावळा  आहॆ . इतिहासाचे स्मरण होत होते . सोबतच्या मित्रांना विचारले वेळ ४ वाजून ३० मि .   अर्धा गड सर करून झाला होता . २ लोक एंक  वेळ जाऊ शकतील एवढीच जागा ,ऐक बाजूला उंच  डोंगर तर दुसर्या बाजूला खोल दरी. वाटेत थोडे थांबत   होतो . खाली बघितले तर  अंधुक प्रकाश्यत पाचाड गाव दिसत होते . शेवटी ५ ला सकाळी  महाद्वार ला  जाऊन पोहचलो .  वाटल रायगड आला पण अजून १ तास लागलेत चढाई करायला कारण थकवा  खुप आला होता . ६ ला सकाळी अखेर  वर पोहोचलो . हळू हळू गर्दी वाढत चालली होती . बरेच  शिवभक्त २ दिवस आधी पासून वर पोहचले होते .
शेवटी ७ ला सगळे  तयार झालेत अन मग रायगडा वर असलेल्या बाजार पेठ पासून आमची मिरवणूक सुरु झाली . एक अदभूत सोहळा चलू होता . शेवटी सकाळी १० ला मिरवणूक राजदरबार पर्यंत पोहोचलि. मिरवणुकीत १ वेगळाच उत्साह होता . महाराज , जिजाऊ,सेनापती ,  मावळे  यांच्या भूमिका सहकाऱ्यांनी केल्या होत्या . शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवत होतो . वाचलेला इतिहास डोळ्यासमोर दिसू लागला . मी स्वतः धन्य झालो होतो  . शेवटी ११ ला मिरवणुकीची चा शेवट झाला . नंतर परत  मुळच्या जागेवर येऊन थांबलू. मग सगळेच बाकीचा रायगड बघायला  निघाले . माझी तहान भूक   कुठ निघून गेली मलाच कळले नाही . शेवटी रायगड बघायला १ दिवस पण कमी पडतो .  जाता जाता महाराजांच्या समाधी ला नतमस्तक झालो ,जगदीश्वर मंदिर आन परतीचा प्रवास चाल झाला . मनात बऱ्याच आठवणी घेऊन गड उतरत होतो . इचा होत नव्हती पण काय करणार ?? शेवटी १ तासात गड उतरून पुनः पाचाड ला आलो . जिजाऊ स्मारकाला वंदन  केले आनी परतीचा प्रवास चालू झाला .
शेवटी असेच म्हणायचे  कि " मन अजुनही रायगडावर आहे आहे "


अमोल नंदकिशोर देशमुख (  जळगाव )
+919970398616
amol2050@gmail.com

सह्याद्री स्वच्चता अभियान-भास्करगड













निमित्त होते दर वर्षी प्रमाणे आमच्या गडवाट संस्था ( परिवारा ) तर्फे आयोजित सह्याद्री स्वच्चता अभियान २०१४ चे . त्या अंतर्गत महाराष्ट्रातील निवडक किल्ले ज्यांवर लोकांचा नेहमी राबता असतो अशे किल्ले निवडण्यात आले होते.आणि अश्या किल्ल्यांवर जाऊन स्वच्छता मोहीम राबवायची होती .  त्या अंतर्गत नासिक विभागातर्फे भास्कर गड निवडण्यात आला . जळगाव वरून जाणारा मी एकटाच होतो . जायचे नियोजन आधीपासून केल होत . २३ नोव्हेंबर ला मोहीम करायचे ठरविले होते . मी जळगाव वरून २२ लाच रात्री निघालो आणि मुक्काम करायचे ठरविले. २३ ला सकाळीच सगळे नाशिक - त्रंबक रोड ला ७ ला जमणार होतो पण मोहिमेसाठी यंदा काही नवीन महिला- मुली येणार होत्या म्हणून जमत जमत सगळे ८. ३० वाजलेत . आमचे मित्र ईश्वर सहाणे आणि दीपक खातडे गावावरून परस्पर येणार होते . ईश्वर सहाणे हे म्हणजे चालते बोलते इतिहासकार . कोणते हि गड किल्ले असोत किवा इतिहास असो त्यांच्याकडे सगडी माहिती तुम्हाला मिळणार अगदी google च्याही पलीकडे .
सकाळच्या बोचर्या थंडीत आणि धुक्यात bike ने आम्ही भास्कर गडावर जायला निघालो . नाशिक च्या भाहेर पडताच त्रंबक च्या डोंगरांगा चालू झाल्या . सगळ्यात आधी दिसतो तो  तो किल्ले अंजनेरी . ज्या किल्ल्यावर हनुमान जन्मले असे म्हटले म्हटले जाते . नंतर अखेरीस आम्ही भास्कर गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाडा या गावी येउन पोहचलो . आमचे सहकारी ईश्वर दादा आणि दीपक भाऊ तिकडे तिकडे केवाचेच येउन बसले होते . आम्ही गाड्या पायथ्याशी लाऊन आमचा प्रवास चालू केला . भलामोठा भास्कर गड वर बघितल्यावर दिसून पडत होता . सहजच किल्ला सर होईल असे वाटत होते  जसजसे वर चढत गेलो तसतशी किल्ल्याची वाट दमछाक करणारी होती . वाटेत ३ ते ४ वेळा थांबून आम्हाला ३ तासानंतर भास्कर गडाचा बुरुज दिसून आला तेवा जाऊन आतापर्यंतचा आलेला सगळा थकवा अगदी क्षणात निघून गेला . पण थोडे पुढे गेल्यावर कळले कि अजून किल्ल्यावर जाण्यासाठी आमाला त्या बुरुजाला डोंगराच्या कडेने वळसा घालून जायचे होते म्हणजे अजून ४० ते ४५ मिनिट लागणार होते . पुढे गडाच्या खालून जाणारी वाट अन वाटेत लागणारा गार वारा सुखद अनुभव देऊन गेला. पुढे सरकत असताना डावीकडे खडकात कोरलेल्या २-३ गुहा दिसून आल्या आणि उजवीकडे दिसून येत होता तो भलामोठा फनीचा डोंगर . शेवटी ४ तासांच्या दमलेल्या चढाई नंतर आम्हाला गडाच्या अखंड दगडी कोरलेल्या पायर्या दिसून आल्या अन मग कुठे माझ्या जीवात जीव आला .
आमच्या सोबत असलेल्या बच्चे कंपनी ट्रेक चा पुरेपूर आनंद घेत होती . वर पायर्या चढून झाल्यावर दिसून आला तो किल्ल्याचा प्रवेशद्वार . पावसाच्या पाण्यामुळे बराचसा भाग बुजून गेलेला होता तरी त्याच्यावर केलेले कोरीव काम अगदी थडक पणे  दिसून येत होते . वर गेल्यावर स्वर्गात पोहोचल्याची अनुभूती येत होती . समोर हरिहर किल्ला , डाव्या बाजूस फनीचा डोंगर आणि उजव्या बाजूस त्रंबक च्या डोंगर रांगा दिसून पडत होत्या . सगळे सगळे क्षण मी माझ्या कॅमेर्यात टिपत होती . मेमोरी सुद्धा फुल झाली शेवटी .  मग नंतर आम्ही गडावर १ झाडाखाली बसून जेवणावर ताव मारला . दुपारचे २ वाजले होते . जेवण झाल्यावर सगळ्यांनी थोडा वेळ आराम केला आणि नंतर मग आम्ही आमच्या स्वच्छता अभियानास सुरुवात केली . गडावर कचरा तसा फारच कमी होता कारण हा गड तसा फारच दुर्गम . शेवटी वेळ आली ती परतायची . उतरायच्या आधी आम्ही सगळ्यानी गारद ( शिवनामाचा जयघोष ) देऊन खाली उतरायला सुरुवात केली . उतरत असताना वाटेत दिसणारा कचरा आम्ही गोळा करत होतो . सोबत आणलेले पाणी जवळपास संपले होते . संध्याकाळचे ५ वाजेला परत आम्ही पायथ्याला येउन पोहचलो .

किल्ल्याचा इतिहास आणि पाहण्याची ठिकाणे खाली दिल्याप्रमाणे



किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्‍या टप्प्यात ब्रम्हगिरी, अजनेरी हे किल्ले येतात.प्राचिनकाळी नालासोपारा, डहाणू, वसई इ बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘बसगड’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

Bhaskargad (Busgad)

Bhaskargad

Bhaskargad
इतिहास :
त्र्यंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. पण काताळात खोदलेल्या किल्ल्यावर जाण्याचा सर्पिलाकार मार्ग व पाण्याची सातवहान कालीन टाकी किल्ल्याच प्राचिनत्व सिध्द करतात.
इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.
पहाण्याची ठिकाणे :
भास्करगडचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. असमान उंचीच्या पायर्‍या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडल गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वाराच्या आतील रचनेवरुन तेथे पहारेकर्‍यांसाठी देवड्या असाव्यात. पण आज हा सर्व भाग मातीखाली गाडला गेलेला आहे.
प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. पण उजव्याबाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या विस्तिर्ण पठारावर पोहचतो. किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे, मंदीराचे अवशेष, बुजलेली टाक, साचपाण्याचा तलाव त्याच्या कठी असलेला व दगडात कोरलेला हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात.

गडवाट वर्धापन दिन. दि १७ जुलै - शिवनेरी










निमित्त होत गडवाट वर्धापन दिन. दि १७ जुलै. गडवाट ने आपल्या ४ थ्या वर्ष्यात पदार्पण केल आहे . बघता बघता इवल्याश्या रोपट्याचे रुपांतर आज मोठ्या वातावृक्ष्यात झाले आहे. फेसबुक वर ३-४ भटक्या मित्रांनी बनवलेल्या ग्रुप चे रुपांतर आज संस्थेत झाले आहे, संस्थेत म्हणण्या पेक्ष्या मोठ्या परिवारात झाले आहे. गडांचे संवर्धन करता करता अनेक सामाजिक उपक्रम गडवाट ने राबविले आहेत.
२० जून ला वर्धापन दिनाच्या अनुशंघाने शिवनेरी किल्ल्यावर बाल-गोपालांसोबत  गड भ्रमंती आणी किल्ल्यावर त्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला होता .
२० जुलै ला सगळ नियोजन ठरले होतं. मी सुद्धया  ठरवलं. ओढ लागली ती शिवनेरी चढायची आणि शिवरायांच्या जन्म स्थळाला भेट देण्याची. महाराज ज्या किल्ल्यावर जन्मले ,खेळले,लहानाचे मोठे झाले तो किल्ला कसा असणार? याची सर्वात जास्त उत्स्तुकता लागून होती . माझ्या सोबत जळगावचे माझे जवळचे मित्र रवींद्र पाटील हे सुद्धा होते . त्यांच्यासाठी हा १ वेगळा अनुभव होता . १९ तारखेला जॉब संपवून आम्ही संध्याकाळी नाशिक ला जायला निघालो . पाऊस असल्या कारणाने नाशिक ला पोहचायला बराच वेळ लाऊन गेला . नाशिक ला रात्री मुक्काम करून भल्या पहाटे शिवनेरी ला जायचे ठरले होते. रात्री १२ ला नाशिक ला पोहचलो. सकाळी ४ ला उठून लगेच निघायचे होते. बाकीचे गडवाट चे नाशिक चे मित्र सोबत येणार होते.
९ जन जमलो त्यात २ वक्तिमत्व हे माझ्यासाठी अगदी वेगळे होते . १ ईश्वर माने २ डॉ गायकवाड . या गोघाचे इतिहासाच अभ्यास एकदम दांडगा .
शेवटी शिवनेरी चा प्रवास चालू झाला. नाशिक ते शिवनेरी अंतर १५० किमी . तवेरा गाडी ने आम्ही निघालो होतो . जवळपास ३ तास लागणार होते.
गाडीत हळू हळू इतिहासाच्या गप्पा चालू झाल्या . गप्पामध्ये वेळ कसा निघून गेला काही लाळले सुद्धा नाही .
सकाळी जवळपास ९ ला आम्ही जुन्नर ला पोहचलो. जुन्नर म्हणजे पुणे जिल्ह्यातील १ तालुका . त्यालाच लागून शिवनेरी किल्ला आहे.
शिवनेरी च्या पायथ्याला ला १ हॉटेल आहे "शिवनेरी" म्हणून . तिथे सगळ्यांनी थांबून नाश्ता करून घेतला . सगळे तयारी करून शिवनेरी चढायला निघालेत . वाटेत मुंबई, पुणे येथून आलेले गडवाटकरी भेटत होते . सर्व जण पायथ्याला एकत्र जमलेत . आमच्या सोबत जुन्नर मधील
जिल्हापरिषद प्राथमिक शाळा कुलवडे आणि संत गाडगेबाबा विद्यालय येथील लहान मुल सोबत जमली होति. खरतर यांच्या साठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
अखेरीस त्या मुलांसोबत आम्ही गड चढायला सुरुवात केली . गड चढत असताना दिसून येत  होते कि किल्ल्या ची डागडुगी करण्यात आलेली आहे . सगळा परिसर स्वच्छ्य होता . अधून मधून पाऊस येत होता ,थंडगार वारा सुटला होता . पायथ्याशीच लावलेल्या नकाशा पाहून किल्ल्याचा अंदांज  येतो.
किल्ल्यावर सुरवातीला किल्ल्याच्या महादरवाजा लागतो जेथून किल्ल्यात  प्रवेश होतो
इतिहास थोडक्यात असा आहे कि
१५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला.
थोड वर चढल्यावर दिसून येतो तो भला मोठा "अंबरखाना"(हत्ती - घोडे ) गडावर बांधून ठेवण्यासाठी असलेल  ठिकाण . त्याच्या मागे उभा असलेला विराट सह्याद्री दिसून येतो.
अधून मधून पाऊस  येत होता आणि थंडगार हवा येत होती . एक अविस्मरणीय अनुभव येत होता . छोटी मुल त्याचा पुरेपूर आनंद घेत होती . त्यांच्या चेहर्यावरील स्मित हास्य बरेच काही सांगून जात होत . १ तासात गड चीमुक्ल्यांसोबत चढून पूर्ण झाला. सर्व शाळकरी मुल आणि गडवाटकरी किल्ल्यावर पोहचले .
किल्ल्यावर जिजाऊ मा साहेब आणि लहान शिवबा ची प्रतिकृती आहे .  त्यसमॊर कार्यक्रम होणार होता . सगळे जण तिथे  येउन बसलेत . कार्यक्रमाला सुरुवात झाली .प्रस्तावना आणि मान्यवरांचे मनोगत पूर्ण झाले. त्यानंतर मूळ शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम चालू झाला . प्रत्येक गडवाटकार्याच्या हाताने लहान मुलांना साहित्य वाटप चालू झाले .
शालेय साहित्य  मध्ये   शाळेची ब्येग ,वह्या ,रंग, पाण्याची बाटली ,काम्पौस पेटी इत्यादी साहित्य होते. साहित्य वाटप झाल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावरील  आनंद बरेच काही सांगून जात होता,त्यानं.तर ३०० पुस्तकांचे ग्रंथ त्या लहान मुलांच्या  शाळेला  भेट  देण्यात आले .शेवटी खाऊ वाटप करण्यात आला .
कार्यक्रम संपल्यावर सगळे जण किल्ला बघायला निघाले .  आमच्या सॊबत इतिहासाचे गाढे अभ्यासक ईश्वर माने होते, ते आम्हाला मार्गदर्शन करत होते . शिवनेरी वर १ मस्जिद सुद्धा आहे. यावरून  असं दिसून  शिवाजी महाराज \कुण्या जातीच्या किवा धर्माच्या विरोधात नव्हतेच. गडावर  पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये  म्हणून लहान - मोठे कुंड तयार करून ठेवलेले  आहे . पाण्याच निचरा होण्याचे उत्तम उदाहरण किल्ल्यावर आहे .
या नंतर आम्ही गेलो थेट शिवजन्म  स्थळ येथे .तिथे आम्ही शिवरायांना नमन  केले. त्याठिकाणी मध्ये  शिवरायांची मूर्ती आणि डाव्या बाजूला पाळणा ठेवण्यात आलेला आहे . येथेच शिवराय जन्मले ,आम्ही तेथे नतमस्तक झालो .
बराच वेळ झालेला होता , दुपारचे २ वाजले होते . आम्ही पुढे बघायला निघालो " कडेलोट" टोक . शिवनेरी च शेवटच टोक, तेथे पोहोचल्यावर दिसत होता तो विराट सह्याद्री. ज्याने आपल्या कुशीत बरेच काही सांभाळून ठेवले आहे . तेथे जाणवणारी निस्ताब्धता , जोरदार वाहणारा वारा मनाला शांतता देत होती . नजर जाईल तिथपर्यंत दिसणारा अथांग निसर्ग आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा. तिथून परतायची मन होत नव्हते पण वेळ कमी होता.
नंतर मग आम्ही सगळ्या गड वाट कर्यांचा निरोप घेतला आणि गड परत खाली उतरायला सुरुवात केली . पुन्हा एकदा शिवनेरी ला सगळ्यांनी वंदन केली आणि सगळे खाली उतरायला निघाले . गड खाली उतरत असताना वाटेत लागते " शिवाई" देवी च मंदिर . याच देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव महाराजांचे ठेवण्यात आले . देवीचं  दर्शन घेतले,तेथे थोडा वेळ बसून परत खाली परतीचा प्रवास चालू झाला .
पायथ्याशी आलो तेव्हा ५ वाजले होते . शेवटी बर्याच आठवणी मनात साठवून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला . गाडी मधून परतत असताना दिसून येत होता तो विरत "शिवनेरी".
पावसाळा +ट्रेक +समाजकार्य  या सगळ्याचा अनुभव मनाला वेगळेच समाधान देऊन गेला . शिवनेरी या आठवणीसाठी सदैव मनात राहील .