पावसाळा म्हटला म्हणजे
नेहमीच ओढ असते ती भटकंतीची. यंदा पावसाची चांगलीच कृपादृष्टी खान्देशावर
असल्यामुळे सभोवतालचा परिसर हिरवाईने नटलेला दिसतोय. मग रविवारच्या
सुट्टीचे काहीतरी सार्थक व्हावे म्हणून आम्ही ६ मित्र (कैलास
पाटील,स्वप्नील देशमुख ,राहुल तमखाने,वाल्मिक चित्ते,जितेंद्र वडदकर आणि
मी)मिळून चार चाकीने सहलीचे नियोजन केले. जळगाव पासून जवळच असलेल्या वाघळी
येथील हेमाडपंथी मुधाई देवी मंदिर, श्री क्षेत्र वालझिरी पुढे चाळीसगाव
वरून यावल अभयारण्यात पाटणादेवी मंदिर,तेथील प्रमुख आकर्षण असलेला धबधबा
आणि नंतर जंगलातून वर चढून गेल्यावर असलेल्या प्राचीन पितळखोरे लेण्या.
असा प्रवासाचा मार्ग निश्चित करून रविवार दिनांक १६ जुलै रोजी सकाळीच
जितेंद्र च्या चारचाकीने जळगाव वरून जाण्यास प्रस्थान केले.
जळगाव
वरून पुढे गेल्यावर पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा धरणी मातेने जणू हिरवा
शालू नसल्याचे चित्र दिसत होते. कॅमेरा नेहमीप्रमाणे सोबतीला होताच,
खिडकीजवळ मागे बसून मी सगळे मित्र, गाडीत चालू असलेलें जुने गाणे, मधेच
जुन्या आठवणीत अचानक उडणारे हास्याचे फवारे, गाडीत येणार गार वारा हे सगळं
एक वेगळाच आनंद आणि मानसिक समाधान देत होत.
क्षणात
एक दीड तास कसा निघून गेला कळाले नाही. पुढे पनीर पार केल्यानंतर
चाळीसगाव रस्त्याला लागूनच डाव्या बाजूने लागून एक प्राचीन मंदिर लगेच
दिसून येते. हे मंदिर म्हणजे वाघळी येथील मुधाई देवी मंदिर. गाडी मंदिराजवळ
लावून लगेचच आम्ही मंदिर बघण्यास सुरुवात केली.
हे
मंदिर एका आंशिक रूपाने नष्ट झालेल्या कृत्रिम दगडावर बांधलेले आहे. याचे
बांधकाम इ स ११५० ते १२०० च्या आसपास केले गेले असावे. या पूर्वमुखी
मंदिराची ताऱ्याच्या आकाराचे विधान असून त्यात एक गर्भगृह,अर्धमंडप व
मंडपाची योजना आहे. या मंदिराचे पीठ,वेदिबंध तसेच जांघेचा भाग सुरक्षित
असून शिखर नष्ट झालेले आहे. शिखराच्या जागी दगड आणि सिमेंट चे छत
सुरक्षिततेसाठी तयार केले आहे. मंदिराच्या भिंती,रत्न,पाने,भौमितिक व
ग्रासमुखाच्या आकृतींनी सुशोभित आहेत. मंदिराच्या उत्तर,पश्चिम आणि
दक्षिणेस मध्यभागी भिंतीवर क्रमशः चंडिका ,सूर्य आणि गणेशप्रतिमा
प्रामुख्याने विद्यमान आहेत.
मंदिराच्या
आत दाराची चौकट, छत तसेच आधारस्तंभ यावर अत्यल्प अलंकरण आहे आणि याच्या
गर्भगृहाची चौकट पाच शाखायुक्त असून ती वरील बाजूनी नवग्रह तर खालील बाजूस
पाने भौमितिक आकारांनी सुशोभित आहे. द्वारशाखेवर एकावर एक दोन मुर्त्या
घासल्या गेल्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड जाते . गर्भगृहात एका नंदीवर
बसलेले उमा महेश्वर मूर्ती आहेत.
याच्या पुरातात्विक महत्त्वामुळे भारतीय पुरातत्व विभागाने यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.
शेवटी
कॅमेरा मध्ये सगळे फोटो काढून एक ग्रुप फोटो घेऊन आम्ही पुढे चाळीसगाव
साठी रवाना झालो. बराच वेळ होऊन गेला असल्याकारणाने सगळ्यांना जोरदार भुका
लागल्या होत्या.चाळीसगाव मध्ये एका हॉटेल वर थांबून साऊथ इंडियन डिशेश वर
सगळ्यांनी ताव मारला. बराच वेळ झाल्याने आम्ही पुढे पाटणादेवी च्या दिशेने
निघालो. वाटेतच श्री क्षेत्र वालझिरी येथील नवनाथ ऋषी मंदिराचे दर्शन
घेतले आणि पुढे निघालो. यावल अभयारण्य एन्ट्री पॉईंट ला एन्ट्री तिकीट घेऊन
गाडी पार्क करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो.
पाटणादेवी मंदिराची माहिती -
पाटणादेवी हे जागृत आदिशक्ति चंडिकादेवीचे पुरातन मन्दिर आहे. हे मन्दिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी
ऊंच
चौथार्यावर धवल तिर्थापासुन उगम पावलेल्या डोगरी नदीच्या किनारी
आहे.जवळ्च असलेल्या पाटणा य़ा लहान गावाचे नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या
नावाने ओळखले जाते. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य
आणि
मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.तिन्हीबाजुने अर्धचन्द्राकार
सह्याद्रि पर्वताचे ऊंचकडॆ, विविध वृक्ष, वनस्पति डोंगरातुन खळखळ वाह्णणारे
ऒंढे यामुळे मन मोहुन जाते. विशेषत: पावसळ्यात
औगस्ट
सप्टेंबरमधे येथील वातावरण मनला प्रसन्नता देणारे, शांत व अल्हाददायक
असते. ह्या दिवसात मन्दिरच्या चौथार्यावरुन मन्दिराचे भोवतलचा परिसर
म्हणजे वनराइने नटलेले पर्वताचे ऊंच कडे, रंगिबेरंगी
फ़ुला – फ़ळानी बहरलेले वृक्ष, सापासारखे नागमोडी खळ्खळ वाहनारे ओढे, हे सर्व दृष्य पाहताना मन सर्व गृहस्थी जिवन विसरुन निसर्गाशी
एकरुप झल्याशीवाय राहात नाही. अशा या रमणीय़ ठिकणाचा पुर्व ईतिहास तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे.
मंदिर
दर्शन, फोटो काढून झाल्यावर लगेचच पुढे पितळखोरे लेण्या बघण्यासाठी वर
चढायला निघालो. थोडे वर गेल्यावर लगेचच थकवा जाणवू लागला. त्या दिवशी पाऊस
नसल्याकारणाने ऊन-सावलीचा खेळ चालू होता,गर्मी वाढली होती. माझे मित्र
कैलास,जितेंद्र यांचे चढतांनाचे हाल बघण्यासारखे होते. मी वाल्मिक
,स्वप्नील सोबत चढत होतो आणि मागे कैलास,राहुल आणि जितेंद्र बसत बसत वर
येत होते. २ तासाच्या चढाई नंतर शेवटी आम्ही लेण्याजवळ येऊन पोचलो. वाटेल
लागलेल्या पाण्याच्या ओढ्याने सगळे जण प्रसन्न झालेत. लगेचच आम्ही जास्त
वेळ वाया न घालता लेण्या बघण्यास सुरुवात केली.
पितळखोरा लेण्यांची महिती-
महाराष्ट्राच्या
पश्चिम घाटातील सातमाळा डोंगररांगेत असलेला एकूण १८ लेण्यांचा समूह
म्हणजेच पितळखोरा लेण्या. औरंगाबाद पासून ८० किमी आणि चाळीसगाव पासून ३०
किमी अंतरावर या लेण्या आहेत . बौद्ध वास्तुकलेचा उत्कृस्ट नमुना म्हणजे
पितळखोरा लेण्या. या लेण्यांचे बांधकाम दुसऱ्या शतकात झालेले असावे असे
अभ्यासातून दिसून येते.
सध्या
खान्देशातील चांदोरा टेकडीवर हा लेण्यांचा समूह दिसून येतो. या लेण्या बघत
असतांना घेतलेली मेहनत आणि त्याकाळात असलेली कलाकृती लगेच जाणवू लागते.
या गुहा २ भागात विभागल्या आहेत.पहिल्या भागात १४ चा समूह आणि दुसऱ्या भागात ४.
४
चैत्य लेण्या आणि बाकीचे विहार आहेत. सगळ्या लेण्या हिनयना काळातील आहेत
आणि उरलेल्या पैंटिंग ६व्या शतकातील महायानां काळातील आहेत.
सगळ्यात
महत्वाची लेणी क्रमांक ३ जी चैत्य गृह म्हणून ओळखली जाते. चैत्यगृहात
गुफेच्या दोन्ही बाजूने गोल स्तूप आहेत. या स्तूपांवर अजिंठ्या लेण्यांवर
करण्यात आलेल्या पैंटिंग सारखे चित्र आहेत. यातील बरीचशी चित्र हि भगवान
गौतम बुद्धाची उभी आणि बसलेल्या स्वरूपातील असून ती अजूनही ठळक स्वरूपात
दिसून येतात.
विहारांमध्ये प्राचीन काळातील सभागृह पद्धत आहेत जिथे गृहाच्या मध्यभागी लहान बैठक व्यवस्था केलेली दिसते.
लेणी
क्रमांक ४ हि खूप सुंदर अजून त्यात जणांसाठी पायर्यांचा चढता मार्ग असून
सुरुवातील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन दगडात कोरलेले भले मोठे
द्वारपाल दिसून येतात. त्यांचा पेहराव पाहता शाका संस्कृती दिसून येते.
प्रवेशद्वाराच्या भिंतीला लागून त्यात दगडावर कोब्रा जातीचे साप कोरलेले
आहेत.
विहाराच्या मध्ये गेल्यावर ९
हत्ती कोरलेले दिसून येतात आणि शेवटी अर्धअश्व स्वरूपातील माणसाची
प्रतिकृती दिसून येते ज्यास चौरी असे म्हणतात. समोरच यक्ष प्रतिकृती दिसून
येते.
येथे असलेले दोन शिल्प ( यक्ष आणि गजलक्ष्मी ) मुंबई मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत.
मुंबई वरून पितळखोरा यायचे असल्यास ३६५ किमी अंतर आहेत.
सगळं
बघून झाल्यावर बराच वेळ झालेला होता जवळपास दुपारचे दीड वाजले होते.
आम्ही लगेचच खाली उतरायला सुरुवात केली शेवटी परत मंदिराकडे जाताना उजव्या
बाजूने वळत धबधब्या कडे वळलो. काही क्षणात समोर दिसून येतो तो भलामोठा उंच
धबधबा. रविवार असल्याने बरीचशी गर्दी दिसत होती. आम्ही सगळ्यांनी
सुरक्षेच्या कारणाने आधीपासून पाण्यात न जाण्याचा निर्णय घेतलेला होता.
थोडा वेळ थांबून थोडे फोटो काढून जवळपास ४ वाजेच्या दरम्यान आम्ही परतीला
निघालो. वेळेचे अगदी काटेकोर नियोजन करत आम्ही परत एकदा देवीला वंदन करून
चाळीसगाव च्या दिशेने निघालो. वाटेत राहुल धुळ्याचा असल्याने त्याला बस
स्टॅन्ड ला सोडून कैलास च्या चाळीसगाव येथील घरी आलो . तिथे फ्रेश होऊन चहा
भिसकिट खाऊन सोबत पाण्याच्या बाटल्या घेऊन अखेर आम्ही जळगाव च्या दिशेने
परत निघालो.
अमोल देशमुख



Nice keep writing sir ji
ReplyDeleteThank You Sir
DeleteNice post sir
ReplyDeleteThank You Sir
DeleteSuperb vachata vachata tyach moment la punha pohochalo Ase vatat hote atach kalach jaun alo ki Kay. Bhari sir ji and thank you. Never forget this memories.
ReplyDeleteThank You Sir
DeleteNice word to expressed all of event.
ReplyDeleteThank You Sir
DeleteNice Sir
ReplyDeleteThank You Sir
Delete