Friday, August 14, 2020

जळगांव माझ्या नजरेतून

 जळगांव माझ्या नजरेतून 

कोविड  १९ महामारीने तीन महिने घरात बसणं माझ्यासारख्या भटक्याला किती अवघड गेलं असेल याची कल्पना न केलेली बरी . लोकडाऊन असतांना आणि उठल्यावर हफ्त्यातून २-३ दिवस संध्याकाळी फिरणं हे नित्य नियमाचं. फोटोग्राफी म्हटलं कि माझा जीव कि प्राण. घरात बसून फोटो काढून किती काढणार?? आणि कसले काढणार ?? आपल्याला मस्त निसर्गात जाऊन सूर्योदन आणि सूर्यास्त आणि निसर्गाचे फोटो काढायला आवडतात. लोकडाऊन मध्ये मग घरी असल्याने रिकाम्या वेळेचा पुरेपूर सदुपयोग घेत जमेल तेव्हा मोबाईल ने घराजवळील आणि शहरातील ठिकाणांचे बरेच फोटो काढले. त्यातील काही निवडक आणि मला आवडलेले फोटो इकडे ब्लॉग च्या माध्यमांतून तुम्हाला दाखविण्यासाठी हा सगळा प्रपंच. यात असलेले सगळेच फोटो हे मी माझ्या मोबाईल ने काढलेले आहेत. फोटोनंतर ठिकाण कुठल आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. 

अधिक करून फोटोस हे मिरर इमेजेस आहेत. म्हणजे पाऊस पडून गेल्यावर पावसाच्या पाण्यात दिसणारे प्रतिबिंब. यात कुठलीही हेराफेरी केलेली नाही (सॉफ्टवेअर किंवा इतर काहीही वापरलेलं नाही ). सगळेच नैसर्गिक फोटो आहेत. तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा करतो. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे सजेशन माझ्यासाठी मोलाचे ठरतील. त्यासाठी तुम्ही पोस्टवर कंमेंट करू शकता . 

अमोल नंदकिशोर देशमुख 

९९७०३९८६१६



या फोटोच ठिकाण सांगायची गरज वाटत नाही तरी ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी - हे ठिकाण म्हणजे जळगावकरांच्या अगदी जवळचं आणि हक्काचं - मेहरूण तलाव. मित्रांसोबत किंवा परिवारासोबत सकाळ संध्याकाळ किंवा दिवसभरातून कधीही जाऊन थोडा वेळ इकडे घालविला कि सगळं टेन्शन नाहीस होत . माझ्या घरापासून हे ठिकाण फक्त एक किलोमीटर अंतरावर . वाटलं तेव्हा मी इकडे निघून येतो . आणि प्रत्येक वेळेस या तलावाचं आणि परिसराचं रूप मला फोटो घेण्यास भाग पाडत . 

हा फोटो म्हणजे लोकडाऊन मधील अशीच एक निवांत दुपार. तलावाच्या कडेस एकटाच बसलेला हा मनुष्य, न बोलणारा ,स्वतःच्या दुनियेत मग्न दिसून आला. लगेचच यात एक गोस्ट दडलेली मला जाणवली आणि मी मोबाईल काढून फोटो घेतला .जवळून गेल्यावर बघितलं तर हा माणूस कणकेचा गोळा घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे तलावात फेकत होता.खाली पाण्यात बघितल्यावर छोटे छोटे मासे गर्दी करून होते. त्या माणसाच्या मागे तीन  कुत्रीसुद्धा निवांत बसलेली होती . बहुदा त्या माणसाचं तिकडे रोजच येणं जाण असावं असं वाटतं होत. मी सुद्धा बराच वेळ तिकडे थांबून होतो. कणकेचा गोळा संपताच तो माणूस काहीही न बोलता लगेचच निघून गेला. 



वरील फोटो मुद्दाम कृष्णधवल केला आहे . हे ठिकाण मोहाडी रोड वर मंदिराच्या मागे असलेली टेकडी. खाली दिसणारा परिसर म्हणजे खुबचंद साहित्या टॉवर ,डाव्या बाजूला दिसणारी इमारत म्हणजे नवीन बांधण्यात येत असलेलं महिला शासकीय रुग्णालय. फोटो मला खास आवडण्याचं कारण म्हणजे वर आकाशात जमा झालेला एकमेव भलामोठा ढग . 


लोकडाऊन मधील फोटोग्राफी च अजून एक आवडीचं ठिकाण म्हणजे घराची गच्ची . रोज संध्याकाळी वर बसून निवांत सूर्यास्त बघत बसायचं . रोज आकाशात दिसणारे रंग हे दंग करून सोडतात आणि सगळं काही विसरायला भाग पडतात. अशीच एक रंगबिरंगी संध्याकाळ मोबाईल मध्ये कैद करण्याचा प्रयत्न . 



मेहरूण तलाव गणेश घाटावर धुणं धुण्यास आलेली एक महिला. निळ्या आकाशाचं पाण्यात उमटलेलं प्रतिबिंब . 




मेहरूण तलाव गणेश घाटावर धुणं धुण्यास आलेली एक महिला. निळ्या आकाशाचं पाण्यात उमटलेलं प्रतिबिंब .


मेहरूण तलाव परिसरात दुपारी फेरफटका मारायला गेल्यास हा अनुभव नक्कीच येतो. संपूर्ण तलावाभोवती मासे पकडणारी माणसं तुम्हाला नक्कीच दिसून येतील. एक वेळच्या जेवणाची सोय किंवा मासे विक्री करून उदरनिर्वाह करणारी बरीच कुटुंब या तलावावर अवलंबून आहेत. बऱ्याच कुटुंबाचं पालनहार म्हणून देखील मेहरूण तलावाची ओळख आहे . 






जॉगिंग ट्रॅक सोबत सूर्य नारायणाची जमिनीवर पडलेली सोनेरी  किरण .




मेहरूण तलाव परिसरात संध्याकाळी भरून आलेलं आभाळ .





मोहाडी रोड आणि लांडोरखोरी परीसर हा सायकलींग आणि पायी फिरणाऱ्यांसाठी कायम वर्दळीचा. पाऊस पडून गेल्यावर या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात जणू आकाश जमीनीवर येऊन ठेपलाय असा भास मला झाला, लगेचच मोबईल मध्ये मिह क्षण कैद केला . 






गिरणा पंपिंग रोड ,रेल्वे पुलाच्या अलीकडे असलेल्या सिमेंट दुकानाला लागून साचलेल्या पाण्यात घराचे प्रतिबिंब 



रिकाम्या पडलेल्या रेल्वे रुळांवर पावसामूळे पाणी साचलेले आढळलं .मग त्याच पाण्याचा उपयोग करत माझ्या मित्राचे प्रतिबिंब फोटोत कैद करण्याचा प्रयत्न .



वरील सर्व फोटो जळगांव च्या विविध भागांमध्ये मोबाईल च्यासहाय्याने घेतलेले आहे. यासाठी फिरणं आणि तुमचं निरीक्षण महत्वाचं . जिथे कुठं स्वच्च पाणी साचलेलं दिसेल तिथे चांगली फ्रेम किंवा फोटो काढता येईल का हे मी बघतो . फोटो मध्ये एखादा ऑब्जेक्ट असला तर फोटो अधिक बोलका दिसतो . त्यासाठी प्रत्येक फोटोमध्ये तुम्हाला काहीतरी दिसेलच . वरील सर्व फोटो हे मोबाइल मध्ये काढलेले आहेत . 




                                                            मेहरूण तलाव परिसर


मेहरूण तलाव परिसर


    
                                                                    मेहरूण तलाव परिसर




एक नयनरम्य संध्याकाळ आणि ढगांमधून पडणारा पाऊस 


    
                  मेहरूण तलाव परिसर एक नयनरम्य संध्याकाळ 




मोहाडी गावानजीक असलेल्या डोंगरावरून दिसणारा परिसर. समोर भरून आलेला आभाळ. 




मोहाडी रोड आणि लांडोरखोरी परीसर हा सायकलींग आणि पायी फिरणाऱ्यांसाठी कायम वर्दळीचा. पाऊस पडून गेल्यावर या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडलेल प्रतिबिंब , लगेचच मोबईल मध्ये मिह क्षण कैद केला . 




ए . टी . झांबरे विद्यालयसमोर साचलेल्या पाण्यात पडलेलं (फोटो मोबाईल उलटा करून बघा )




मेहरूण तलाव परिसर मध्ये सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी झालेली गर्दी ( फोटो मोबाईल उलटा करून बघा )



                                                    कोल्हे हिल्स कडे जाणारा रस्ता 


मेहरूण तलाव परिसर ( मित्राचं पाण्यात पडलेले प्रतिबिंब )


गिरणा पंपिंग रोड ,रेल्वे पुलाच्या अलीकडे असलेल्या सिमेंट दुकानाला लागून साचलेल्या पाण्यात घराचे प्रतिबिंब 


गिरणा पंपिंग रोड 



गिरणा पंपिंग रोड ,रेल्वे पुलाच्या अलीकडे असलेल्या सिमेंट दुकानाला लागून साचलेल्या पाण्यात कुत्रा निवांत बसून होता  त्याच पाण्यात पडलेलं प्रतिबिंब ( फोटो मोबाईल उलटा करून बघा )



गणेश घाटाच्या भिंतीवर बसून मासे पकडतांना मुलगा

अशी अजून अनेक वेगवेगळ्या परिसराची फोटो मालिका तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. जर खरंच तुम्हाला आवड असेल तर आहे त्या उपकरणाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आजूबाजूचं सौंदर्य तुमच्या मोबाईल मध्ये कैद करू शकता. मी माझ्या परीने केलेला हा छोटासा प्रयत्न . आपणास काही सूचना ,जागा किंवा इतर काही गोष्टी सुचवायच्या असतील तर कृपया नक्की कळवा . तुम्ही मला कॉल ,msg किंवा मेल करू शकता .  

अमोल देशमुख

९९७०३९८६१६

amol2050@gmail.com

Instagram Id - amol2050